वाचनापासून दूर जाणऱ्या आजच्या पिढीला प्रेरना देण्यासाठी पुण्यातील पुस्तकप्रेमींनी भन्नाट शक्कल लढवली आहे. चक्क रिक्षामध्ये वाचनालय सुरु करुन वाचनाला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. रिक्षामध्ये सुरु केलेल्या या फिरत्या वाचनालयाला कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले आहे. प्रशांत कांबळे व प्रियांका चौधरी आणि सहकारी यांनी या उपक्रमाची सुरुवात केली.